ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
Trending

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ : येतोय नवा सिनेमा

राजकुमार संतोषीचं नऊ वर्षांनी पुनरागमन

Spread the love

गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं होतं. तसेच महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या माध्यमातून दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर पाहायला मिळणार आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क
महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हा विषय नेहमी चर्चेचा आणि वादाचाच राहिला आहे. या विषयावर अनेक नाटके, पुस्तके निघाली. याच संवेदनशील विषयावर एक नवा चित्रपट येत आहे. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) असे या चित्रपटाचे नाव आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार संतोषी सांभाळणार आहेत.

राजकुमार संतोषी हे तब्बल नऊ वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी नुकतीच त्यांनी या सिनेमाची घोषणा केली. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट येत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सुप्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे.

दोन विचारधारांमधील युद्ध
गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं होतं. तसेच महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या माध्यमातून दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर पाहायला मिळणार आहे.

येत्या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्वावर म्हणजेच 26 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमात गांधी आणि गोडसे यांची भूमिका नक्की कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण पवन चोप्रा आणि मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या सिनेमाचा भाग असू शकतात असे म्हटले जात आहे. चिन्यमयने या सिनेमाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

राजकुमार संतोषी यशस्वी दिग्दर्शक
राजकुमार संतोषी यांनी 80 चं दशक चांगलच गाजवलं. ‘दामिनी, घातक, घायल, खाकी, अजब प्रेम की गजब कहामी, अंदाज अपना अपना असे अनेक गाजलेले सिनेमे राजकुमार संतोषी यांनी दिले आहेत. आता पुन्हा एकदा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या निमित्ताने ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

राजकुमार संतोषी यांच्याबद्दल…
राजकुमार संतोषी हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या हिंदी चित्रपटांचे निर्माता आहेत. तो निर्माता-दिग्दर्शक पीएल संतोषी यांचा मुलगा आहे.

संतोषी यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. अर्ध सत्य (1983) या चित्रपटातून गोविंद निहलानी यांच्यासोबत पदार्पण केले. सनी देओल अभिनीत घायाल (1990) आणि दामिनी (1993) या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

चित्रपट
घायल (1990)
दामिनी (1993)
अंदाज़ अपना अपना (1994)
बरसात (1995)
घातक (1996)
चाइना गेट (1998)
पुकार (2000)
लज्जा (2001)
द लीज़ेंड ऑफ़ भगत सिंह (2002)
ख़ाकी (2004)
फैमिली: खून के रिश्ते (2006)
हल्ला बोल (2008)
अजब प्रेम की गज़ब कहानी (2009)
फटा पोस्टर निकला हीरो (2013)

 

सुशांतसिंह राजपूतच्या “त्या” घरात राहायला कोणी धजावेना!

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका