आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

गणेश संपूर्ण आरती आणि बरंच काही

वाचा एका क्लिकवर

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे

गणपती बाप्पाची आरती सर्वांनाच पाठ असेल असे नाही. त्यासाठीच हा अट्टाहास. आपल्यासाठी गणपती बाप्पाची आरती उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील अष्टविनायकांमधील एक मयुरेश्वर. ह्या मोरगावातील गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदास ह्यांना मिळाली असे मानले जाते. ही आरती जोगिया (संगीतातील एक राग) ह्या रागात रचली आहे. आपण गणेश आरतीचे फक्त २ कडवे म्हणतो. मूळ आरतीचे ७ कडवे आहेत. १७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी ही गणेश आरती रचली आहे. (Ganpati aarti Marathi)

संपूर्ण गणेश आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

!!गणपती बाप्पा मोरया!!

————

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण।।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।।

प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन।।
भावें ओवाळीन म्हणे नामा।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।।
त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव।।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।।
बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌।।

करोमि यद्‌त्सकलं परस्मै।।
नारायणायेति समर्पयामि।

अच्युतं केशवं रामनारायणं।।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌।।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।।
जानकीनायकं रामचंद्रं भजे।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।।

——-

गणपती बाप्पा बोलल्यानंतर आपोआप मोरया हा शब्द येतो. नागदेवता गणपती हा कुठलाही सण असो कुठल्याही उत्सवात असो किंवा कुठलीही पूजा असो सर्वात अगोदर आपण श्री गणेशाची आरती गणपतीची आरती आपण बोलत असतो. त्याची पूजा करत असतो.

————

गणपती बाप्पांच्या आरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक (Marathi shlok)

सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षु नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणॆ हेचि आता ॥

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

उडाला उडाला कपि तो उडाला
समुद्र उलटोनी लंकेशी गेला
लंकेशी जाऊनी चमत्कार केला
नमस्कार माझा त्या मारूतीला ॥

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे॥
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी।
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अपराध माझे कोट्यानु कोटी
मोरेश्र्वरा बा तू घाल पोटी ॥

अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र,
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र,
जया आठविता घडे पुन्यराशी,
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी. ॥

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे,
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे.
कवि वाल्मिकीसारिखा थोर ऐसा,
नमस्कार माझा तया रामदासा.

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळीं कोण आहे।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
तेथें तुझे सदगुरू पाय दोन्ही॥

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।
निर्विध्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका