मनोरंजनमाध्यमविश्वरोजगार/शिक्षण
Trending

क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी सुरवसे

Spread the love

सोलापूर : प्रतिनिधी
शेतकरी तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्षत्रीय मराठा फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी शिवाजी सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली.

नूतन सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी सुरवसे यांनी दैनिक लोकमतमध्ये वरिष्ठ पदांवर दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. सध्या ते येस न्यूज मराठी या डिजिटल मीडियाचे संपादक आहेत. निर्भिड, अभ्यासू आणि आक्रमक पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय मोहिते (ठाणे) यांनी शिवाजी सुरवसे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली .यावेळी संघटनेतील शेतकरी नेते माणिक कदम, रवी तिखंडे ,ज्ञानेश्वर चौरे ,ताई जगताप, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, माधव जगताप ,देवदत्त पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

रामदेव बाबांचा पतंजली समूह उतरणार माध्यम क्षेत्रात

नियुक्तीपूर्वी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत माधव जगताप आणि शिवाजी सुरवसे यांनी केले. प्राध्यापक विजय मोहिते यांनी संघटना स्थापनेबाबतचा आपला उद्देश स्पष्ट केला. राज्यातील सर्व जिल्ह्यात या संघटनेचे काम सुरू आहे .शेतकरी आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना केल्याचे प्राध्यापक विजय मोहिते यांनी सांगितले.

“सेक्स तंत्रा” कार्यक्रम अखेर रद्द

यावेळी माणिक कदम यांनी शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची कशी वाट लागत आहे आणि तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी किती छान योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राने तेलंगणाचे अनुकरण करावे आहे असे मत व्यक्त केले.

माध्यमांचा प्रपोगंडा!

आजवर पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे .आता संघटनेच्या माध्यमातून देखील विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिवाजी सुरवसे यांनी दिले.

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका