कौमी एकता सप्ताहानिमित्त विद्यापीठातर्फे सांगितीक मैफिल उत्साहात
ललितकला व कला संकुलातर्फे आयोजन
- कौमी एकता सप्ताहानिमित्त विद्यापीठातर्फे सांगितीक मैफिल
- ललितकला व कला संकुलातर्फे आयोजन
- विद्यार्थी व प्राध्यापकांकडून कलांचे बहारदार सादरीकरण
- कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले मार्गदर्शन
- ललितकला व कला संकुलाच्या संचालिका डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर (विशेष प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कला संकुलाच्या वतीने कौमी एकता सप्ताहानिमित्त सांस्कृतिक एकता व दीपसंध्या ही सांगितीक मैफिल ऑनलाईन पद्धतीने उत्साहात पार पडली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कला संकुलाच्या संचालिका डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २३ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कला संकुलातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी बहारदार सादरीकरण करुन आॅनलाईन सहभागींची मने जिंकली.
गायन करताना डॉ. आनंद धर्माधिकारी. तबला वादन करताना प्रा. दीपक दाभाडे. हार्मोनियमची साथ देताना अमित साळोखे
दीपसंध्या कार्यक्रमामध्ये भावगीत, भक्तीगीत, शास्त्रीय, उपसास्त्रीय गायन, तबला व सितार वादन असे सादरीकरण झाले. या सर्व सादरीकरणातून सर्व कलांच्या एकत्रित सादरीकरणाचा आनंद अनुभवता आला.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरु प्रा.डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव व्ही.बी. घुटे, वित्त व लेखाधिकारी प्रा.डॉ. श्रेणिक शहा आदी मान्यवर सहभागी झाले होते.