कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
दोन डोस घेतलेल्यांना पुन्हा काम लागले
पुणे (विशेष प्रतिनिधी) : देशवासियांसाठी तसेच कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोव्हिशिल्डच्या दोन्ही डोसनंतरही तिसरा बुस्टर डोस घ्यावाच लागेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संस्थापक डॉ. सायरस पूनावाला (cyrus poonawalla) यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या नव्या माहितीमुळे दोन डोस घेतलेल्यांना पुन्हा काम लागले आहे. पहिला व दुसरा मिळवताना अनेकांना कसरत करावी लागत असतानाच अाता पुन्हा तिसरा बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पूनावाला यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीतांजली टिळक उपस्थित होते. लोकांनीही कोव्हिशिल्डचा दूसरा डोस झाल्यानंतर सहा महिन्यांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही पूनावाला यांनी या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पुरस्कार कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, जगभरात किफायतशीर दरात लस देत डॉ. पूनावाला यांनी लोकमान्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे पुण्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही डॉ.पूनावाला यांचे आभार मानत आहोत.’’
डॉ. दीपक टिळक यांनी पुनावाला यांच्या कार्याचे कौतुक केले.
डॉ. सायरस पुनावाला म्हणाले की, सिरमचा आजवरचा प्रवास खूप खडतर आणि वेदनादायी राहिला आहे. पूर्वी परवानग्या मिळण्यासाठी जाच सहन कराला लागायचा. अन्न व औषध प्रशासनाकडून पूर्वी मोठ्या प्रमाणावर लालफितीचा कारभार केला जात होता. मात्र मोदींच्या काळात नोकरशाहीची चहा कॉफीची पद्धत बंद झाल्यामुळे त्यांचा त्रास ही कमी झाला आहे. त्यामुळे आता तातडीने एफडीएकडून परवानगी मिळते. म्हणूनच आम्ही कोविशिल्ड वेळेवर बाजारात आणू शकलो.
परदेशातल्या कंपनीची लस जिथे दुप्पट किमतीला भेटते. तीच लस सिरम कमी किमतीत जगभरात उपलब्ध करून देते. जगात सर्वात स्वस्त कोरोनाची लस सिरम उपलब्ध करते. मी जर आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे विकले असते. तर माझ्या उत्पन्नात खूप भर पडली असती पण आम्ही खूप कमी किमतीत लस दिली आहे. माझ्या कुटुंबाने नफ्याचा त्याग केला आहे. भविष्यातही माझा मुलगा आदर ही परंपरा कायम ठेवेल असा विश्वास वाटत असल्याचे डॉ. पूनावाला यांनी सांगितले.
मी स्वतः कोव्हिशिल्डच्या तिसरा डोस घेतला
शरीरातील कोरोनाविरूद्धची प्रतिपींडे अर्थात ॲन्टीबॉडीज कमी होत असल्याचे ‘लान्सेट’च्या शोधनिबंधातून स्पष्ट होते. मी स्वतः कोव्हिशिल्डच्या (covishield) दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घेतला असून, सिरमच्या कर्मचाऱ्यांनाही(Worker) दिला असल्याचे डॉ. पुनावाला यांनी सांगितले.
हेही वाचा
विद्यापीठे व महाविद्यालये लवकरच सुरू करणार : उच्च शिक्षणमंत्री सामंत
श्रोत्यांसाठी गुडन्यूज, ‘विद्यावाहिनी’ वेब रेडिओवर कार्यक्रमांची मेजवानी
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प रोखेल कोल्हापूर, सांगलीचा महापूर!