कोळे पशुवैद्यकीय केंद्रात लाळखुरकत लसीकरण
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच.नाना
कोळा पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत कोळा, कराडवाडी, कोंबडवाडी ,पाचेगाव व किडबिसरी या गावाचा समावेश होतो या गावातील एकूण पशुगणाने च्या ९०%लस या दवाखान्यात उपलब्ध झाली असून घरोघरी जाऊन हे लसीकरण करण्यात येणार असल्याचे पशुधन अधिकारी डॉ आर पी चंदनशिवे यांनी सांगितलेे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड,सचिन देशमुख ,पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर, याच्या हस्ते गाईचे पूजन करून लसीकरण मोहीम सुरू केलीयावेळी ॲड, सचिन देखमुख म्हणाले सध्या जनावरांना होणाऱ्या आजारापैकी लाळ खुरकत हा रोग होऊ नये म्हणून शासनाने लस उपलब्ध केली आहे सर्व पशु पालकांनी आप आपली जनावरे लसीकरण करून घ्यावी व या रोगापासून आपल्या जनावरांचे नुकसान टाळावे.
यावेळी मारुती सरगर उपसरपंच दगडू कोळेकर ग्रामपंचायत सदस्य डॉ सादिक पटेल अरुण बाजबलकर ,नामदेव आलदर,बिरुदेव सरगर ,संदीपन आलदर ,दिलीप कोळेकर, उद्धव करांडे ,अरविंद देखमुख, प्रल्हाद मेटकरी, शंकर मोरे विनोद काटे, उत्तम आलदर ,दिलीप तेली ,राखमाजी कोलेकर ,राहुल बाबर ,सचिन कोळेकर ,बंडू आलदर , छोट्या मोरे आदी उपस्थित होते पशुपालक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
यावेळीडॉ आर पी चंदनशिवे , पशुधन पर्यवेक्षक दिलीप गोतसुर्वे परिचर विनोद पोरे, शिवाजी सरगर, वसंत कलाल उपस्थित होते.