केंद्रीय विद्यापीठांत ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देश
मुंबई : प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्यांंसाठी गुड न्यूज आहे. देशभरातील जवळपास ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) लवकरच प्राध्यापक भरती (Teacher recruitment) होणार आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी 45 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान दिले. भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व विद्यापीठांनी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे. देशातील अनेक विद्यापीठात प्राध्यापक पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्यात केंद्रीय विद्यापीठांचाही समावेश आहे. स्टेट युनिव्हर्सिटीच्या जागा भरतीबाबत अध्यापक निर्णय झाला नसला तरी केंद्रीय विद्यापीठांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. स्टेट युनिव्हर्सिटीच्या जागा भरतीबाबत विविध संघटनांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक गेह्तली. ते म्हणाले, शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व संस्थांनी मिशन मोडमध्ये काम करावे. आरक्षित प्रवर्गातील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी पुढील आठवड्यात सर्व विद्यापीठांनी जाहिराती जारी कराव्यात. यासाठी ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान वेळ देण्यात आला आहे.
- हेही वाचा : शिक्षकांचे व्यक्तीमत्व घडविते आदर्श विद्यार्थी
- विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ
- सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
- सोलापूर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
- तिसऱ्या लाटेचा धोका, बेड कधीही ताब्यात घेणार : पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
- ‘शेकाप कार्यकर्त्यांनो, पक्षात फूट पडेल असे वागू नका’
शिक्षणमंत्र्यांनी या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली. दरम्यान केंद्रीय विद्यापीठांत ही भारती प्रक्रिया लवकरच सुरु होत असल्याने विद्यापीठांत शिक्षक बनू इच्छिणाऱ्यांंमध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये एकूण ६ हजार २२९ प्राध्यापक पदे रिक्त आहेत. त्यापैकी एससीसाठी १ हजार १२, एसटीसाठी १९२, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) १ हजार ७६७, ईडब्ल्यूएससाठी ८०५, दिव्यांगसाठी ३५० जागा रिक्त आहेत. इतर पदे ही सामान्य श्रेणीतील आहेत.
दिल्ली विद्यापीठासह ४४ केंद्रीय विद्यापीठांपैकी १५ विद्यापीठांमध्ये मंजूर शिक्षकांच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. अलाहाबाद विद्यापीठ आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशामध्ये शिक्षकांच्या पदांवर ७० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.
केंद्रीय विद्यापीठांमध्ये अनुशेषाची भरती प्रक्रिया सुरु झाली ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांतील (State Universityes) तसेच महाविद्यालयांतील (Colleges) रिक्त जागाही तातडीने भरायला हव्यात. यासाठी आम्ही मागील अनेक वर्षांपासून सतत आंदोलने करीत आहोत. सरकार (Maharashtra Government) मात्र वेळकाढूपणा करत आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांतील रिक्त जागाही तातडीने भराव्यात. -डॉ. किशोर खिलारे (राज्य समन्वयक- प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन)
आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc