काय सांगता? फक्त ५०० रुपयांत Jio चा नवा स्मार्टफोन!

महागाईत स्वस्ताईची कमाल, जाणून घ्या ऑफर डिटेल्स

Spread the love

मुंबई : तुम्ही शिर्षक वाचलत ते खरंय. देशातील टेलिकॉम क्षेत्रातील (Telicom Industry) बलाढ्य असणा-या जिओ कंपनीने (Jio Company) आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीय. जिओचा नवा 4G स्मार्टफोन Jio Phone Next गणेश चतुर्थीच्या शुभमुहुर्तावर भारतात दाखल होणार आहे. या नव्या फोनची मूळ किंमत 3,499/- असेल. हा फोन 500/- रुपये देऊन बुकिंग करता येईल.

जिओ कंपनीकडून या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, Gadgets 360 या लोकप्रिय Mobile Analysis वेबसाईटने याचा खुलासा केलाय.

काही दिवसांपूर्वीच Jio Phone Next लवकरच भारतात दाखल होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. Jio कंपनीच्या या सर्वात स्वस्त स्मार्टफोनची खरेदी १० सप्टेंबर रोजी करता येईल. फोनची किंमत आणि सेल संबंधी Gadgets 360 या लोकप्रिय Mobile Analysis वेबसाईटने खुलासा केला आहे. हा फोन फक्त ५०० रुपयात खरेदी करू शकतील, असे त्यांनी म्हटलंय.

आक्रमकपणे करणार मार्केटिंग
जिओ फोन नेक्स्टची सर्वाधिक विक्री करण्यासाठी कंपनीने कंबर कसलीय. त्यासाठी कंपनीने बँक आणि फायनान्स कंपन्यांसोबत पार्टनरशीपचा करारही केलाय. ६ महिन्यात ५ कोटी फोन विक्रीचे टार्गेट कंपनीने ठेवलंय. जिओ कंपनीने SBI, IDFC First Assure आणि DMI Finance सोबत पार्टनरशीप केलीय.

जिओ फोन नेक्स्टची धमाकेदार वैशिष्ट्ये
5.5-inch HD display
13-megapixel rear camera
2,500mAh battery
Android 11 (Go edition)
Qualcomm QM215 SoC
2GB or 3GB of RAM
16GB or 32GB of eMMC 4.5 internal storage.
Dual-SIM support
Bluetooth v4.2 support
GPS connectivity
1080p video recording capability.

बुकिंग व अधिक माहितीसाठी आपण ठिकठिकाणची जिओ सेंटर्स किंवा http://www.jio.com येथे संपर्क साधू शकता.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका