कर्नाटकने उडवली देशाची झोप, बंगरुळूत आलेले दोघे आफ्रिकन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
एक ब्रेकिंग न्यूज पुढे येत आहे. कर्नाटकात (Karnatak) परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी दोन दक्षिण आफ्रिकन (African) नागरिकांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह (Corona Virus) आला आहे. या बातमीने कर्नाटकसह संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. दोन्ही बाधितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कर्नाटक हे राज्य महाराष्ट्राला लागून असल्याने या बातमीमुळे डोकेदुखी वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेवरून भारतात बंगळूरू विमानतळावर दाखल झालेल्या दोन जणांमध्ये कोरोनाचे नवा स्ट्रेन आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही . या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत . बंगळूरुच्या केम्पेगौडा विमानतळावर शनिवारी ( 27 नोव्हेंबर ) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले . या विमानात 594 प्रवासी होते . त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत . बंगळूरूचे आयुक्त के . श्रीनिवास म्हणाले , दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत . परंतु ओमेक्रॉन स्ट्रेनबाबत अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल . विमानात 594 प्रवासी होते त्यापैकी 94 प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत . सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना ‘ आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आलंय . तसंच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलंय . अजूनही काही प्रवाशांची माहिती घेणं सुरू आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता इशारा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने शनिवारी आग्नेय आशिया खंडातील देशांना कोरोना विषाणूच्या संसर्गाचे नवीन प्रकार आढळून आल्याने आणि अनेक ठिकाणी संसर्गाची प्रकरणे वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता वाढविण्यास आणि सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाययोजना मजबूत करण्यास सांगितले आहे. सण आणि उत्सवांमध्ये सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.