एस.आर. मागाडे यांची अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती
पुणे विभागातील 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या
सोलापूर : नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणे विभागातील 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने मंगळवारी Tehsildar Appointment आदेश काढले आहेत. शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगोला तालुक्यातील जवळा गावचे सुपूत्र एस.आर. मागाडे यांची अपर तहसीलदार, संख, जि. सांगली या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. मागाडे हे यापूर्वी मंगळवेढा येथे कार्यरत होते. त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्री. एस.आर. मागाडे हे सध्या निवासी नायब तहसीलदारपदी मंगळवेढा येथे कार्यरत आहेत. ते तलाठी म्हणून महसूल खात्यात जॉईन झाले. पुढे पदोन्नतीने पुरवठा निरीक्षक, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व आता तहसीलदार अशी त्यांची प्रशासकीय सेवेतील वाटचाल आहे. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांची अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल जवळा येथील मागाडे समाजबांधव, ग्रामस्थ, सांगोला, मंगळवेढा व सोलापूरातील मित्र परिवारांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तहसीलदारांचे नाव व कंसात नियुक्ती ठिकाण
1. डी.व्ही . मोहोळ (तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय , सोलापूर रिक्त पदावर)
2. अपर्णा कौलगेकर (सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी (फिरते पथक) पुणे या रिक्त पदावर)
3. बजरंग बंडू चौगुले (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे तहसिलदार समकक्ष पदावर)
4. सुनिल दा . शेळके (तहिसदार (वडिवळे प्रकल्प ) पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)
5. उदयसिंह बा गायकवाड (तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय , सांगली रिक्त पदावर)
6. अंजली ब कुलकर्णी (तहसीलदार (सर्वसाधारण) , जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर रिक्त पदावर)
7. रमेश चिं . पाटील (तहसिलदार, पाटण जि. सातारा रिक्त पदावर)
8. रविंद्र वि. रांजणे (तहसिलदार तासगाव , जि . सांगली रिक्त पदावर )
9. धनंजय ना जाधव (तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय , पुणे रिक्त पदावर)
10. माधवी वि . शिंदे (तहसीलदार , कुकडी प्रकल्प , जि . पुणे रिक्त पदावर)
11. अनंता दे . गुरव (तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय , सांगली रिक्त पदावर)
12. रोहिणी बा. शंकरदास (तहसिलदार (संगायो) , पुणे शहर , पुणे रिक्त पदावर )
13. धनश्री बा . शंकरदास (तहसीलदार , आष्टा , जि . सांगली या रिक्त पदावर)
14. आर.सी. लिंबारे (अपर तहसीलदार, मंद्रूप , जि . सोलापूर रिक्त पदावर)
15. रोहिणी सुरेश घाडगे – घुले (तहसिलदरा (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)
16. एस.आर. मागाडे (अपर तहसिलदार , संख , जि. सांगली रिक्त पदावर)
17. एन.एच. वाकसे (करमणूक कर अधिकारी , जिल्हाधिकारी कार्यालय , सोलापूर रिक्त पदावर)
18. पी.के. पवार (तहसीलदार (करमणूक कर शाखा ) , पुणे रिक्त पदावर)
19. आर.एस. जाधव (सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी , सातारा , रिक्त पदावर ) 20. एन.बी. गायकवाड (तहसिलदार , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , पुणे)