‘एबीपी माझा’च्या अँकर ज्ञानदा कदम यांचे आज व्याख्यान
मीडिया एज्युकेटर्स असोशिएशनतर्फे आयोजन
सोलापूर : प्रतिनिधी
माध्यम शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या राज्यव्यापी संघटनेतर्फे एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. “काय सांगशील ज्ञानदा – महिला आणि प्रसार माध्यमे” असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सोमवार, ५ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ऑनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील माध्यम शिक्षक व माध्यम विद्यार्थ्यांसाठी मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेतर्फे संशोधनात्मक उपक्रमांसह माध्यम विद्यार्थांच्या विकासाबाबत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजिला आहे. एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम या “काय सांगशील ज्ञानदा” या शीर्षकाखाली “महिला आणि प्रसार माध्यमे” या विषयावर माध्यम क्षेत्रातील प्रेरक अनुभव कथन करतील. या व्याख्यानावेळी अभ्यासूपणे, विचारपूर्वक प्रश्न विचारणा-या विद्यार्थिनींपैकी दोन विद्यार्थिनींना ज्ञानदा कदम ह्या पारितोषक देणार आहेत. व्याख्यानाच्या शेवटी त्या नावाची घोषणा करतील.
फेसबुक लाईव्ह व यू-ट्यूब लाईव्हद्वारे हा कार्यक्रम सर्वाना पाहता येईल. माध्यम शिक्षक व माध्यम विद्यार्थ्यांना या व्याखानाचा फायदा होणार आहे.
याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मीडिया एज्युकेटर्स असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम)चे अध्यक्ष डॉ. सुधीर भटकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर, उपाध्यक्ष डॉ. सुंदर राजदीप यांच्यासह संघटनेचे सचिव डॉ. विनोद निताळे, सहसचिव डॉ. शाहेद शेख, कोषाध्यक्ष डॉ. रोहित कसबे, कार्यकारिणी सदस्य डॉ. कुमार बोबडे, डॉ. मोईज हक, डॉ. संजय तांबट, डॉ. मंजुला श्रीनिवास, डॉ. मीरा देसाई, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुहास पाठक यांनी केले आहे.
फेसबुक लाईव्ह लिंक –http://tiny.cc/FB_DnyanadaKadamLive)
यू-ट्यूब लाईव्ह लिंक-