उदनवाडीत लांडग्याचा भयानक हल्ला
अनेक शेळ्यांचा पाडला फडशा
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील काळ्या मळ्यातील एका पशुपालकाच्या घराजवळील वाड्यावर हल्ला केल्याने ४ शेळ्या जागीच मृत्यू झाल्या आहेत. ही घटना मंगळवार 27 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजनेच्या सुमारास घडली आहे.
मागील आठ दिवसांपासून घेरडी पशूपालकांनाही व्यालेली लांडगिन खूप त्रासदायक ठरित आहे. त्यासाठी पिंजरे लावले,तरीही अजून ती सापडली नाही.
याबाबत माहिती अशी की, येथील काळ्यामळ्यात बाळू ईश्वर सरगर हे आपल्या शेतात राहत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या पशुधनासह सात शेळ्याही आहेत. घराजवळच असलेल्या कुंपणात ह्या शेळ्या बांधल्या होत्या. मंगळवार 27 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजनेच्या सुमारास अचानक लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला. यातील २ शेळ्या व २ बोकड जागीच फडश्या पाडला.
नंतर गोंधळ झाल्याने ही घटना लक्षात आली.पण ४ शेळ्या जागेवरच मृत्यू झाल्या होत्या. यामुळे या गरीब पशूपालकाचे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यात लांडग्याचे हल्ले होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जूनोनी वनपरीक्षेत्रा अंतर्गत असलेल्या या भागातही ही लांडग्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. याच वन्यप्राण्यांना वनात पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत.
मागील आठ दिवसांपासून घेरडी पशूपालकांनाही व्यालेली लांडगिन खूप त्रासदायक ठरित आहे. त्यासाठी पिंजरे लावले,तरीही अजून ती सापडली नाही.
आजची उदनवाडी येथील घटनाही खूपच नुकसानकारक आहे.याबाबत वनविभागाला कळविण्यात आले असून,त्यांनी पंचनामा केला आहे.
या गरीब पशूपालकाचे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यात लांडग्याचे हल्ले होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जूनोनी वनपरीक्षेत्रा अंतर्गत असलेल्या या भागातही ही लांडग्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. याच वन्यप्राण्यांना वनात पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत.
हेही वाचा