दत्त जयंती विशेष / डॉ. नाना हालंगडे
उंबर जिथे आहे तिथे श्री. दत्तगुरुंचा वास असतो, असे हिंदू धर्मात मानले जाते. याच्या औषधी गुणांमुळेच उंबराच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्व आहे. तेव्हा हा वृक्ष आपल्याला अमाप अशी निसर्गदत्त, औषध योजना बहाल करतो. आज दत्त जयंती आहे. त्यानिमित्त हा खास लेख..
उंबराच्या सालीचा काढा करून , त्यांत, वेलची, खडीसाखर टाकून सरबत करावे, कँसर सारख्या रुग्णाच्या अंगाचा जो दाह होतो, त्यावर आराम पडतो. दिवसांतून तीनदा घ्यावे. औंदुबरावलेह हे प्रसिद्ध औषध पित्तज विकारांवर प्रसिध्द आहे.
जखम झाल्यास याच काढ्याने धुतल्यास ती वेगाने बरी होते. अतिसाराच्या वेळी रक्त पडल्यास हाच काढा घ्यावा. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिकधर्म जास्त जात असेल, तर सालीचा काढा पोटातून देतात. गर्भपात होऊ नये म्हणून, गर्भाचे पोषण निट व्हावे म्हणून, याच्या सालीचा काढा घेतात.
भस्मक नावाचा रोग आहे. त्यांत सारखी भूक लागते. पोट भरल्याची जाणीव होत नाही. तेव्हा, उंबराची साल दूधांत घोटून द्यावी. कावीळीत, उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. ज्वरदाह, तीव्र तापात, पिकलेले उंबर द्यावे,गोवर, कांजण्या, अतिसार, उन्हाळी, मधुमेह, या सर्व रोगांवर उंबराचे फळ, पाने, फुले उपयोगात आणली जातात.
किटकदंश, विंचूदंश झाल्यास झाडाची पाने वाटून लावल्यास, दाह, वेदना, कमी होतात. तोंडातले अल्सर, व्रण, छाले, यावर उंबराच्या पानावर असे बुडबडे वर दिसतात. ते काढून त्याचि चटणी मधातून चाटण म्हणून द्यावे. तोंडाचा दाह कमी होतो.
अंगात उष्णता, कडकी असल्यास उंबराची दोन फळे रोज सकाळी खडीसाखरेसोबत खावीत.
तृष्णेचा आजार बरा होतो. जेव्हा खूप तहान, तहान होते, जीव कासावीस होतो, तेव्हा उंबराची साल, वा कच्ची फळे पाण्यात कुस्करून सरबत करून द्यावे.
डांग्या खोकल्यावर उंबराचा चिक टाळूवर लावावा. ताबडतोब थांबतो.
किडनी स्टोन (मूतखडा) – उंबराच्या जुन्या झाडाच्या खोडाला खाच द्यावी व तिथेच एक भांडे अडकावे. रात्रभर रस झिरपून भांड्यात गोळा होईल, तो सकाळी पिण्यास घ्यावा. किडनी स्टोन वितळून मूत्रावाटे बाहेर पडतात.
उंबर फळ दूधांत शिजवून खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते. पोटाचे सर्व विकार बरे होतात. विशेषतः हे थंड गुणधर्माचे असल्यानेच, आम्लपित्त, मळमळ, पोटात दाह, अल्सर, सारखे आजार याच्या सेवनाने बरे होतात.
तेव्हा आपल्या परिसरात याचे झाड असणे आवश्यक आहे. अतिशय, उपयोगी, औषधी गुणधर्माचा हा वृक्ष कायम चिरतरुण ठेवावे.