इंचभर जमिनीसाठी वाद होतात, डॉ. नाना हालंगडेंनी मात्र २ एकर समर्पित केली
आबासाहेबांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे गौरवोद्गार, 'भाईंची देवराई' या प्रकल्पाची पाहणी
सांगोला (विशेष प्रतिनिधी): भाई गणपतराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सांगोला तालुक्यात आहेत. तालुकावासियांच्या हिताचाच त्यांनी सदैव विचार केला. त्यांच्या त्यागी प्रवृत्तीचाच आदर्श घेऊन पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी “भाईंची देवराई” साकारली आहे. इंचभर जमिनीसाठी वाद होण्याच्या जमान्यात एखाद्या नेत्याच्या नावाने स्वत:ची दोन एकर जमीन समर्पित करणे, ही मोठी बाब असल्याचे गौरवोद्गार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी काढले.
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावानजिक पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी साकारलेल्या “भाईंची देवराई” या प्रकल्पस्थळी डॉ. अनिकेत देशमुख यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत भुयार (ता. मंगळवेढा) येथील श्री संत बागडे महाराज मठाचे तुकाराम महाराज, विनायक कुलकर्णी, मुख्याध्यापक तुकाराम भुसनर, डॉ. नाना हालंगडे, आर्ट अाॅफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, पत्रकार डॉ. बाळासाहेब मागाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे सोमा आबा माेटे, जागर प्रतिष्ठानचे प्रमुख तथा जतचे नगरसेवक परशुराम मोरे, अनिल मदने, गोपाळ पाथरूट, प्रा. रानोबा करांडे, बिभीषण सावंत भाऊसाहेब, बंडू वाघमोडे आदी उपस्थित होते.
डॉ. अनिकेत देशमुख पुढे म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांचे विचार चिरंतन राहावेत यासाठी उभारलेला भाईंची देवराई हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. आबासाहेबांचे विचार चिरंतन प्रवाहित करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आली आहे. सा प्रकल्पाच्या पाठिशी मी सदैव असेन.
भुयार (ता. मंगळवेढा) येथील श्री संत बागडे महाराज मठाचे तुकाराम महाराज म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांना पाणीदार नेते म्हणून राज्यात ओळखले जाते. त्यांच्या पाणी आंदोलनाची प्रेरणा घेऊनच आम्ही जत तालुक्यात पाण्यासाठी आंदोलन उभा केले आहे. डॉ. नाना हालंगडे यांनी उभारलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यातून पर्यावरण रक्षणाचे शाश्वत कार्य होईल.
निवासी आश्रमशाळेत सत्कार
लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या निवासी आश्रमशाळेत भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह भुयार (ता. मंगळवेढा) येथील श्री संत बागडे महाराज मठाचे तुकाराम महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विनायक कुलकर्णी, मुख्याध्यापक तुकाराम भुसनर, डॉ. नाना हालंगडे, आर्ट अाॅफ लिव्हिंगचे राजू वाघमारे, डॉ. बाळासाहेब मागाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे सोमा आबा माेटे, बंडू वाघमोडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी विनायक कुलकर्णी गुरुजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापक तुकाराम भुसनर यांनी आभार मानले.
हेही वाचा
आबासाहेबांच्या आठवणी सतत चिरंतन राहतील : भाई चंद्रकांतदादा देशमुख
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
सांगोला तालुक्यात लॉकडाऊनला परिवर्तनवादी संघटनांचा आक्षेप
सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ