आबासाहेबांच्या आठवणी सतत चिरंतन राहतील : भाई चंद्रकांतदादा देशमुख
डिकसळमध्ये 'भाईंच्या देवराई'चा शुभारंभ ; एका मिनिटांत 1 हजार 95 झाडांची लागण
(सांगोला : प्रतिनिधी) : शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणा-या आबासाहेबांचे तालुक्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या नावाने डिकसळमध्ये ‘भाईंची देवराई’ साकारलेली आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यासाठी पत्रकार डॉ.नाना हालंगडे यांनी आपली दोन एकर शेतजमीन देवून आबासाहेबांच्या आठवणी चिरंतर ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने मोठे कार्य केले आहे. या उपक्रमातून आबासाहेबांच्या आठवणी चिरंतन राहतील, असे प्रतिपादन भाई गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांतदादा देशमुख यांनी केले.
तालुक्याचे भाग्यविधाते, विक्रमादित्य आमदार, राज्याचे पणन व रोजगार हमी मंत्री भाई मा.आमदार गणपतराव देशमुख यांच्या आठवणी जागविण्यासाठी डिकसळमध्ये ‘भाईंची देवराई’ साकारण्यात आली आहे. यामध्ये देवराई, गणवन आदिंची 1 हजार 95 झाडे एका मिनिटांत लावण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देवराई फाऊंंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे मेंबर सर्व्हेसर्वा रघुनाथ ढोले, पिंपरी चिंचवड लायन्स क्लबचे मेंबर तथा उद्योगपती ला. दामोदर आसबे, श्री.श्री.रविशंकर साखर कारखान्याचे चेअरमन शेषगिरीराव, डॉ. बाबासाहेब देशमुख, सभापती राणीताई कोळवले, उपसभापती नारायण जगताप, आर्ट ऑफ लिव्हिंगचे टिचर सोमनाथआबा सोनवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक तुकाराम भुसनर, मा.उपसभापती तानाजी चंदनशिवे, विनायक कुलकर्णी सर, मा.जि.प.सदस्य प्राध्यापक किसन माने, राजू वाघमारे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना चंद्रकांतदादा देशमुख म्हणाले की, आबासाहेबांनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आपले अवघे जीवन वेचले. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लावल्या. तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक पुसला. स्त्री व पुरूषांना समान वेतन हा कायदा अंमलात आणला. त्यांचे हे कार्य मोठे आहे. पण आज त्यांच्या जाण्याने तालुक्याचे पालकत्वच हिरावले आहे. आम्ही देशमुख कुटूंबिय तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहे. आज सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर आबासाहेबांच्या नावाने जी देवराई उभी राहते. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे आबासाहेबांच्या आठवणी चिरंतर राहणार असून, हा आगळा वेगळा प्रयोग सर्वासाठीच लाभदायी ठरणार आहे. देशमुख कुटूंबियांच्या वतीनेही या देवराईच्या कामासाठी सदैव मदतीचा हात राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, देवराई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ना. रघुनाथ ढोले म्हणाले की, देवराया ह्या पूर्वीसारख्याच आहेत. पण जसजसे आधुनिककरण होत गेले. तसतसे वृक्ष नष्ट होवू लागले. पण मी या देवराई वाचविण्यासाठी शर्तीने प्रयत्न करीत आहे. देवराई, धनवण, व फळबाग आदी प्रकारची झाडे या देवराईमध्ये असणार आहेत. आतापर्यंत 73 देवराई राज्यामध्ये साकारण्यात आलेल्या आहेत. ही डिकसळमधील 74 वी देवराई आहे. मी तुम्हाला झाडे देत नाही तर माझ्या मुलीच देतो. यासाठी 1 टक्का काम माझे आहे. 99 टक्के काम तुम्हीच करावयाचे आहे. या देवराईमध्ये 128 प्रकारची झाडे असून, यामध्ये झाडांचे ग्रंथालय, बियाणांची बँक आदिही साकारण्यात येणार आहे. खरे तर, झाडांच्या मूळापासून ते पानांपर्यंतचा उपयोग या देवराईतून सर्वांना मिळणार आहे. अशा या देवराई वाचविण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. या देवराईमध्ये गावातील भांडणतंटे, विद्यार्थ्यांच्या सहली, वाढदिवस, बारश्याचे कार्यक्रम, डोहाळ जेवण, व अन्य कार्यक्रम ही घेता येतात. आज राज्यामध्ये आदर्श असलेल्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिच्या नावाने देवराई उभी राहते. हे फार मोठे कार्य आहे. असेही ढोले यांनी शेवटी सांगितले.
यावेळी सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विजय म्हेत्रे, मा.जि.प.सदस्य प्राध्यापक किसन माने, आर्ट ऑफ लिव्हिंगचे टिचर सोमनाथ आबा सोनवणे, सभापती राणीताई कोळवले आदींनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास जि.प.सदस्य अॅड. सचिन देशमुख, मा.सभापती बाळासाहेब काटकर, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सोमाआबा मोटे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगिताताई धांडोरे, संगम धांडोरे, चेअरमन आनंदराव यमगर, उद्योगपती पिंटू पुकळे, मायाप्पा यमगर, सोलापूर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक गणेश पाटील, घेरडीच्या सरपंच सुरेखाताई पुकळे, पारेचे माजी सरपंच मधुकर गोरड, बाळासाहेब पुकळे, उद्योगपती राजू गावडे, सोनंदचे सरपंच समाधान पाटील, बुरंगेवाडीचे सरपंच अर्जुन बुरूंगे, वाणीचिंचाळेचे माजी सरपंच चिदानंद स्वामी सर, नागेश जाधव, डिकसळचे सरपंच चंद्रकांत करांडे, उपसरपंच रणजित गंगणे, बाळासाहेब बनसोडे, किशोर बनसोडे, ज्ञानेश्वर भोसले, मुरलीधर करांडे, बंडू वाघमोडे, आप्पासो भुसनर, संदिप करांडे, संदिप भुसनर, सचिन चंदनशिवे, शिवाजी कुंभार, पोस्टमास्टर उत्तम गायकवाड, औदुंबर पवार, अनिल खरात, यांच्यासह सांगोला रोटरी क्लबचे सर्व सदस्य, बर्याच गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम भुसनर सर यांनी केले. सूत्रसंचालन विनायक कुलकर्णी यांनी तर आभार पारेचे माजी सरपंच मधुकर गोरड यांनी मानले.
हेही वाचा
गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ डिकसळमध्ये साकारणार ‘भाईंची देवराई’
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
विद्यापीठे व महाविद्यालये लवकरच सुरू करणार : उच्च शिक्षणमंत्री सामंत
खा. शरद पवार सांगोल्यात; गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना झाले भावूक