आठवडाभराच्या विश्रांतीनंतर जवळा येथे जोरदार पाऊस
पावसाळा संपत आला तरी नदी नाले मात्र कोरडेचं
जवळा/दिपक कांबळे
जवळा ता.सांगोला येथे आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
संपूर्ण राज्यभरात समाधानकार पाऊस पडत असून अनेक नद्या नाल्यानां पूर आला परंतू पिढ्यानपिढ्या दुष्काळाचा सामना करणार्या सांगोला तालुक्यात समाधानकार पाऊस पडला नाही.
तालुक्यातील प्रमूख नद्यांपैकी एक असलेली कोरडा नदी पावसाळा संपत आला तरी अद्यापही कोरडीच आहे.
नदीला जरी पाणी नसले तरी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.