आज सांगोला आगारातील आणखी चौघे निलंबित
पहिल्या दिवशी मिळाले 5,869 रुपये; आज 36 कर्मचारी कामावर हजर
सांगोला/ नाना हालंगडे
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली. त्यामुळे कामावर हजर राहा असे सांगितले. तरीपण सांगोला आगारातील कर्मचारी हजर राहत नाहीत. त्यामुळे आज मंगळवार 7 डिसेंबर रोजी आणखी चारजणांना निलंबित केले आहे. काल एसटी सेवा सुरू केली अन् सांगोला आगाराला 5 हजार 869 रूपये इतके उत्पन्नही मिळाले.
आकडे बोलतात
सांगोला आगारात कालपासून एसटी सेवा करण्यात आलेली आहे. काल तीन मार्गावर तर आज ही याच तीन मार्गावर ही एसटी धावणार आहे.
- काल धावलेल्या बसची संख्या : 3
- एकूण किलोमिटर : 279
- एकूण फेऱ्या : 13
- एकूण खर्च :16 हजार रूपये
- एकूण उत्पन्न : 5 हजार 869 रू.
राज्यभर एसटी कामगार विलीनीकरनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. अशातच सरकारने पगारवाढ केल्याने संप मागे घ्या असे सांगितले आहे. पण त्यामुळे आमचे 45 कामगारानी जीवनयात्रा संपविली,त्यामुळे आम्ही दुखवता म्हणून कामबंद आंदोलन 45 दिवस ठेवले आहे, असे ते सांगत आहेत. कालपर्यंत राज्यातील दोन हजाराच्या आसपास आगारे सुरू झाली असून, सांगोला आगारही काल सोमवार 6 डिसेंबर सुरू झाले आहे.
काल आगारातून सोलापूर, जत व आटपाडी या तीन मार्गावर एसटी बसेस धावल्या. एकूण 13 फेऱ्यातून या एसटी 279 किलोमिटर इतक्या धावल्या. यातून आगाराला 5 हजार 869 रूपये इतके उत्पन्नही मिळाले. तर कालचा डिझेल, व कामगारांचा पगार असा 16 हजार रूपये इतका खर्चही आला.
आगारात 320 कर्मचारी असून,अजूनही बरेच कर्मचारी कामावर हजर राहत नाहीत. त्यामुळे प्रशासन कालपर्यंत 25 जणांचे निलंबन तर 9 जणांच्या बदल्या केल्या आहेत. आज पुन्हा 4 जणाचे निलंबन केले आहे. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 29 आज अखेर झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी सोलापूरसाठी सकाळी 8 वाजता बस सोडण्यात आलेली आहे. तर जतला साडे बारा वाजता तसेच आटपाडीला दुपारी 2 वाजता बस सोडण्यात येणार आहे. आज आगारा चालक,वाहक व अन्य असे 36 कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. अशी माहिती आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी दिली.