अपघातानंतर कार पेटली, तरुण ड्रायव्हर जळून खाक
सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
थिंक टँक : नाना हालंगडे
कारचा अपघात होऊन लागलेल्या आगीत ड्रायव्हर तरुणाचा होरपळून अंत झाला. सांगली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मकबूल गौसलाजम पटेल (वय 25) असे होरपळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
खानापूर तालुक्यातील बलवडीमधील मकबूल गौसलाजम पटेल (वय 25) असे होरपळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मकबूलच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी अपघात झाला आणि नंतर गाडीने पेट घेतला. त्यामुळे कारसह चालकही जळून खाक झाला. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही कल्पना नव्हती. जुना सातारा रस्त्यावरील आंधळी फाट्यानजीक हा अपघात झाला. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मकबूल याचा फळांचा व्यापार आणि केळी निर्यातीचा व्यावसाय होता. अपघाताच्या दिवशीही त्याने घरी यायला रात्री उशीर होईल, असे फोन करून सांगितले होते. पलूसकडून बलवडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंधळी फाट्याजवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. अपघातावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणालाही कल्पना नव्हती. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अपघातात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती.
मकबूल यांच्या शरीराचा बहुतांश भाग जळाला होता. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी पेटलेली गाडी पाहून टोल फ्री नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
या घटनेने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पाहा खास व्हिडिओ