अनिल खरात यांनी देवराईला दिला मदतीचा हात
देवराईच्या कंपाऊंडसाठी मदतीचे आवाहन
अनिल खरात यांनी आपल्या या जन्मदिनी डिकसळ येथील भाईंच्या देवराईतील तार कंपाऊंडसाठी तीन हजार शंभर रूपयाचा निधी देवराई प्रतिष्ठानकडे सुपूर्त केला. भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करावी तसेच सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन केले होते. त्यानुसार खरात यांनी ही मदत केली आहे.
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्याचे विक्रमादित्य आम. स्व. गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी, स्वीय सहाय्यक अनिलभाऊ खरात यांनी आपल्या वाढदिनानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून भाईंच्या देवराईतील तार कंपाऊंडसाठी ३१०० रूपयाचा निधी देवराई प्रतिष्ठानकडे सुपूर्त केला.
अनिलभाऊ खरात हे स्व. आबासाहेबांचे विश्वासू स्वीय सहाय्यक होते. गेली 25 वर्षापासून ते आबासाहेबासमवेत काम करीत होते. अत्यंत गरीब परिस्थितील अनिल खरात आजही देशमुखांच्या घरी पी.ए.चे काम करीत आहेत.
रविवार 2 जानेवारी 2022 रोजी अनिल यांचा 33 वा वाढदिवस होता. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा न करता त्यांनी हा वाढदिवस साजरा केला नाही.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आबासाहेबाना आपल्यातून जावून एक वर्षही झाले नाही. त्यामुळे मी हा वाढदिवस साजरा करणार नाही. तसे त्यांनी सर्व मित्रमंडळींना सांगितलेही होते. खरे तर दरवर्षी मित्रमंडळीच हा माझा जन्मदिन साजरा करतात.
अनिल खरात यांनी आपल्या या जन्मदिनी डिकसळ येथील भाईंच्या देवराईतील तार कंपाऊंडसाठी तीन हजार शंभर रूपयाचा निधी देवराई प्रतिष्ठानकडे सुपूर्त केला. भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करावी तसेच सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन केले होते. त्यानुसार खरात यांनी ही मदत केली आहे.
अनिल खरात हे आबासाहेबांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून अनेक प्रश्न मार्गी लावित आहेत.
भाईंची देवराई तार कंपाऊंड मदत निधी
1) सोमा (आबा) मोटे, रासप सोलापूर जिल्हाध्यक्ष : 5001/-
2) राजूभैय्या वाघमारे, जवळा : 5001/-
3) डॉ. मंगेश लवटे, अन्न सुरक्षा अधिकारी,कोल्हापूर : 1001/-
4) डॉ. बिरा बंडगर, महाराज जवळा : 1001/-
5) अनिलभाऊ खरात, स्व. आबासाहेब यांचे पी.ए.(हबिसेवाडी) : 3100/-
6) काकासाहेब करांडे, सर : 1001/-
7) यशराजे गांडूळ खत प्रकल्प, वांटबरे : 1111/-